दोष देणे (नाम)
दोष देण्याची क्रिया.
खोड (नाम)
झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
सावली (नाम)
एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
धुके (नाम)
जमिनीवर येणारे पातळ अभ्र.
घुंगट (नाम)
डोक्यावरून व तोंडावरून घेतलेला साडी, ओढणी किंवा चादरीचा भाग.
मधुमेह (नाम)
ज्यात एकसारखी व थोडीथोडी लघवी होते व त्यावाटे शरीरातील साखर किंवा शर्करा काही अंशतः निघून जाते असा रोग.
हिंग (नाम)
एका झाडाचा अतिशय उग्र वास असलेला चीक.
रोमांच (नाम)
अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
देणगी (नाम)
धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
बेडूक (नाम)
गोड्या पाण्यात राहणारा एक उभयचर प्राणी.